पोटच्या गोळ्याच्या मूत्यूपेक्षाही परंपरा ठरली सरस !!

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जन्माला आल्यानंतर अवघ्या एका दिवसात जगाचा निरोप घेतलेल्या चिमुरड्याच्या नशिबी जन्मदात्यांचे अंतिम प्रेमही आले नाही. नवरात्रीच्या काळात बाळ आणि बाळंतिणीला स्पर्श करायचा नसतो, या अंधश्रद्धेपोटी आई वडिलांनी मृत बालकाला हात लावण्यासही साफ नकार दिला. शेवटी स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत त्या निष्पाप जीवाला आपल्या कुशीत घेत सन्मानाने
भूमीदान दिले.
गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात भुसावळ येथील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय महिलेने मुलाला जन्म दिला होता. मात्र, मंगळवारी सकाळी या नवजात बालकाचा मृत्यू झाला. दुःखाच्या प्रसंगी आई-वडील हवालदिल
स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी निभावले माणुसकीचे कर्तव्य
होतील, अशी अपेक्षा असताना नवरात्रीचे कारण पुढे करत त्यांनी मृत बालकाला शिवण्यास नकार दिला. सेंट्रल नाका स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.
स्मशानभूमीचे
काळीज पिळवटले
कर्मचारी
गायकवाड आणि रामेश्वर साबळे रुग्णालयात पोहोचले तेव्हा तेथील प्रकार पाहून अवाक झाले. या दोघांनीच बालकाचा मृतदेह आपल्या हातावर उचलला आणि दुचाकीवरून स्मशानभूमीकडे घेऊन गेले. विशेष म्हणजे, बालकाचे वडील त्यांच्यासोबत दुचाकीवरही बसले नाहीत; ते मागून रिक्षाने आले.
देवराज
स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर वडिलांनी केवळ पावती फाडण्याची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर कर्मचारी देवराज आणि रामेश्वर यांनीच खड्डा खणून त्या चिमुरड्यावर दफनविधीचे संस्कार पूर्ण केले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून अंधश्रद्धेची ही भीषणता पाहून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions